Saturday, April 11, 2020

भारतीय शास्त्रीय संगीत

*हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत*

   आज शास्त्रीय संगीत म्हंटलं की बोर आणि कंटाळा वान वाटत.पण संगीत ही अशी संकल्पना आहे की ती प्रत्येक सजीवांच्या जीवनातील एकटे पणा दूर करणारी व आयुष्यभर साथ करणारी आहे. पहा ना माणूस जन्मतो तो सुरातच रडतो, तो शेवटच्या श्वास देखील संगीतमय ठेक्यात घेत असतो. तो आयुष्य भर जे करतो फिरतो चालतो बोलतो ते संगीतातच. चालत असला तरी ठेक्यात.बोलतो चिडतो सप्तका मध्ये.
        
           संगीत हे सजीवांना जसे डोलायला लावत तसेच निर्जीव वस्तूमध्ये देखील नाचवण्याची व हालचाल घडवून आणते. विषारी असणारा साप देखील संगीतावर डोलतो.
       हे सर्व होते हे संगीतामधील शास्त्र मूळे. तानसेनांन सारखे गायक आपल्या गायनाने दीपक राग गाऊन आग लावू शकतात,मेघमल्हार राग गाऊन पाऊस पाडू शकतात. भगवान श्रीकृष्ण आपल्या मधुर बासरीच्या सुरांच्या जादूने निसर्ग मंत्रमुग्ध करतात. तर श्री महादेव तांडव करताना ब्रम्हांडा मध्ये भैरव चे स्वर झंकार करतात. अश्या या संगीतात किती शक्ती असू शकते. याचा अनुभव हा शास्त्रातून कळतो.


                          -:समाप्त:-
                                                अजिंक्य दारोळे
                                                    स्वरसंगम
11 एप्रिल 2020

भारतीय शास्त्रीय संगीत

  भारतीय शास्त्रीय संगीत: संगीत कला की महागाथा एक परिचय भारतीय शास्त्रीय संगीत , एक बहुत ही महत्वपूर्ण और रमणीय संगीत परंपरा है, जो भारतीय स...

Contact for enquiry

Name

Email *

Message *

Blog Archive

भारतीय शास्त्रीय संगीत: संगीत कला की महागाथा